पंतचा शेजारी, टेनिसने क्रिकेट, आरसीबीचा नेट बॉलर ते मुंबईचा संकटमोचक; कोण आहे आकाश मधवाल?
मागील दोन सामन्यात आकाश मधवाल मुंबईसाठी संकटमोचक ठरतोय. दोन सामन्यात मधवाल याने 9 विकेट घेतल्या आहेत. जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत आकाशने भेदक मारा केलाय. आकाश मधवाल याचे नाव सध्या देशभरात चर्चेत आहे. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास कठीण होता. आकाश मधवाल याने 24 व्या वर्षी लेदर बॉलर प्रक्टिस सुरु केली. त्याआधी तो टेनिस क्रिकेटने खेळत होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंजिनिअरिंग सोडून त्याने क्रिकेटमध्ये नशीब अजमावले. 2021 मध्ये आकाश मधवाल आरसीबीचा नेट बॉलर होता. मुंबई इंडियन्स याने त्याला खरेदी केले अन् संधीही दिली. त्यानंतर त्याचे नशीब फळफळले.. आणखी एक विशेष बाब म्हणजे, मधवाल ऋषभ पंत याता शेजारी आहे.. पंतच्या कोचकडूनच त्यानेही क्रिकेटचे धडे गिरवलेत.. पंत आणि मधवाल उत्तराखंडचे रहिवासी आहेत.
आकाश मधवालनं यंदाच्या हंगामात आयपीएल 2023 मध्ये पदार्पण केलं. यंदाच्या आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूने मुंबई इंडियन्सला क्वालिफायर सारखा महत्त्वाचा सामना जिंकून दिला. मुंबई इंडियन्ससाठी खरा हिरा ठरलेल्या या खेळाडूला संघाने फक्त काही लाख रुपयांना संघात सामील केलं. पण, या खेळाडूनं लाखमोलाची कामगिरी केली आहे
मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील आयपीएल 2023 (IPL 2023) एलिमिनेटर सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडिअमवर खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर्सचा 81 धावांनी पराभव केला. मुंबईच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला आकाश मधवाल. यात मधवालने केवळ 5 धावांत पाच बळी घेतले.
मुंबईच्या या 29 वर्षीय खेळाडूनं पदार्पणाच्या मोसमात संघासाठी फार महत्त्वाची कामगिरी केली आहे. आकाश मधवाल हे नाव आता प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या तोंडून ऐकू येत आहे. मुंबई इंडियन्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधवालने आपल्या संघासाठी जे काम केले ते करोडो रुपये मोजणारे खेळाडूही करू शकले नाहीत.
मुंबई इंडियन्सच्या टीमने आकाश मधवालला 20 लाख रुपयांच्या किमतीला आपल्या टीममध्ये सामील केलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एका मोसमात मधवालला मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि आज त्याने कर्णधार रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला. सूर्यकुमार यादवच्या जागी 2022 मध्ये मधवालचा मुंबई संघात समावेश झाला असता. पण आयपीएल 2022 मध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
आकाश मधवाल हा उत्तराखंडच्या पांढऱ्या चेंडू संघाचा कर्णधार आहे. 2020 मध्ये मधवाल नेट बॉलर म्हणून आरसीबी संघाला भाग होता. 2021 मध्ये तो लिलावात अनसोल्ड राहिला. आरसीबी (RCB) च्या आकाशची प्रतिभा न ओळखल्याने मुंबई इंडियन्स संघाने 2022 मध्ये त्याला संघात सामील केलं. मधवाल यंदाच्या हंगामात जसप्रीत बुमराहची जागा उत्तमरित्या सांभाळताना दिसत आहे.
आकाश मधवालला मुंबई इंडियन्सकडून आयपीएल 2023 मध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीत यश न मिळाल्याने आकाश मधवालला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली. आकाश मधवालने संधीचं सोनं केलं. अवघ्या काही सामन्यांमध्ये आकाश या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला आहे.