कोंडण्यपूरच्या रुक्मिणीच्या पालखीचं पंढरपूरला प्रस्थान
विदर्भाची पंढरी आणि आई रुक्मिणी मातेचे माहेर अशा श्रीक्षेत्र कोंडण्यपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थानतर्फे पंढरपूर वारी 23 तारखेला प्रस्थान झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआई रुक्मिणी मातेचा पायदळ पालखी दिंडी सोहळा 428 वर्षांपासून सुरु आहे.
संत सदाराम महाराजांनी 1594 साली या वारीला प्रारंभ केला होता.
वारीचे हे 429 वे वर्ष आहे.
आई रुक्मिणी मातेची ही पालखी अतिशय जुनी असल्याने जागोजागी या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केलं जाते.
ही पालखी 26 तारखेला अमरावतीला आल्यावर आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून बियाणी चौकात भव्य स्वागत केलं जातं.
अमरावतीला मुक्काम झाल्यावर दुसऱ्या दिवशी 27 तारखेला राजापेठ या ठिकाणी राणा दाम्पत्याकडून भव्य स्वागत केलं जाईल.
25 जून रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचं आगमन होईल तर 29 जून (आषाढी एकादशी ) पर्यंत पंढरपूर येथेच मुक्कामी राहणार.