Vande Bharat Express : उत्तराखंडला मिळाली पहिली वंदे भारत एक्सप्रेस, जाणून घ्या सविस्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरुन या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. तर दिल्लीसाठी ही सहावी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीपासून अजमेर, वाराणसी, कटरा, भोपाळ आणि अंब अंदौरा या स्थानकावरुन ही वंदे भारत एक्सप्रेस धावेल.
उत्तराखंडसाठी ही पहिलीच वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे. तर भारतातली ही 18वी वंदे भारत एक्सप्रेस आहे.
हि रेल्वे डेहराडूनपासून दिल्ली आणि दिल्लीपासून डेहराडूनपर्यंत चालवण्यात येईल. ही प्रवाश्यांसाठी एक आरामदायी सुविधा असणार आहे.
आता दिल्ली ते डेहराडून हे अंतर 4 तास 45 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
तर ही वंदे भारत एक्सप्रेस 302 किमीचा प्रवास करेल. ही रेल्वे बुधवार सोडून आठवड्यातून सर्व दिवस धावेल.
दिल्ली ते डेहराडून या वंदे भारत तिकीटाचे दर 1,065 आणि 1890 रुपये असणार आहे.
ही वंदे भारत एक्सप्रेस आनंद विहार रेल्वे स्थानकावरुन संध्याकाळी 5.50 वाजता सुटेल आणि रात्री 10.53 मिनिटांनी डेहराडून रेल्वे स्थानकावर पोहचेल.