IPL 2021: आयपीएलमध्ये उत्तम कामगिरीनं बदलू शकतं 'या' खेळाडूंचं नशीब, वर्ल्डकपसाठी टीम इंडियात लागू शकते वर्णी
आजपासून कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावात इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीझनची सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या या पर्वात काही युवा खेळाडूंवर बीसीसीआयचं लक्ष असणार आहे. तसेच खेळाडूंचं लक्ष असणार आहे आगामी वर्ल्डकपसाठी भारतीय संघात जागा मिळवण्याचं. पाहुयात हे कोणते खेळाडू आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवदत्त पडीक्कल: देवदत्त पडीक्कलनं स्थानीय स्तरावर क्रिकेट खेळायला सुरुवात 2018 साली केली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्यानं जबरदस्त कामगिरी केली होती. तसेच गेल्या आयपीएलमध्ये त्याने विराट कोहलीपेक्षा अधिक धावा केल्या होत्या. जर तो असाच खेळत राहिला तर भारतीय संघात वर्णी लागू शकते.
राहुल चहर: राहुल चहरला नुकतंच भारतीय संघात स्थान मिळालं होतं. त्यानं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्सचा तो महत्वाचा खेळाडू आहे. त्याचीही निवड वर्ल्डकपसाठी होऊ शकते.
ईशान किशन: ईशान किशन मागील काही काळापासून विकेटकीपर फलंदाज म्हणून नावारुपाला आला आहे. ईशाननं आतापर्यंत 51 आयपीएल सामन्यांमध्ये 1211 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियंसकडून खेळताना या खेळाडूनं 2020 च्या आयपीएलमध्येही जबरदस्त कामगिरी केली होती. यंदाही त्यानं अशीच चांगली कामगिरी केली तर त्याची निवड वर्ल्डकपसाठी भारतीय संघात होऊ शकते.
रवि बिश्नोई: राजस्थानचा 20 वर्षीय लेग स्पिनर रवि बिश्नोईनं मागील हंगामात चांगली कामगिरी केली होती. जर तो असाच खेळत राहिला तर भारतीय संघात वर्णी लागू शकते.
राहुल तेवतिया: राहुल तेवतियानं आयपीएलच्या मागील पर्वात शानदार कामगिरी केली होती. पंजाबविरोधात एका षटकात पाच सिक्सर ठोकून तो चर्चेत आला होता. शानदार फलंदाजीसह तो उत्तम गोलंदाज देखील आहे. त्याने चांगलं प्रदर्शन केलं तर ऑलराऊंडर म्हणून त्याला भारतीय संघात जागा मिळू शकते.