IPL 2021 Salary: विराट कोहलीपासून महेंद्रसिंह धोनीपर्यंत, पाहा कोणत्या संघाच्या कर्णधाराला मिळतं किती मानधन ?
IPL 2021 All Teams Captain Salary इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाची सुरुवात अवघ्या काही तासांनी होणार आहे. कोरोनाचं सावट असतानाही आयपीएलचा हंगाम पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. क्रिकेटच्या विश्वात होणाऱ्या या महाकुंभामध्ये आकर्षणाचा विषय असणारा आणखी एक मुद्दा म्हणजे, खेळाडूंना मिळणारं मानधन. प्रत्येक संघात लाखो आणि करोडोंची बोली लावून खेळाडूंची निवड केली जाते. त्यात नजरा असतात त्या म्हणजे संघाच्या कर्णधाराला मिळणाऱ्या मानधनाकडे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडेविड वॉर्नर म्हणजे सनरायजर्स हैदराबाद या संघातील मुख्य फलंदाज आणि संघाचा कर्णधार. यंदाच्या वर्षी त्याला 12.50 कोटी रुपये इतकं मानधन मिळणार आहे.
के.एल. राहुलला 2020 मध्ये पंजाबच्या संघाच्या कर्णधारपदी निवडण्यात आलं. यंदाच्या वर्षी त्याच्या मानधनाचा आकडा आहे, 11 कोटी रुपये.
राजस्थानच्या संघातून सुरुवात करणारा संजू सॅमसन 2016 मध्ये दिल्लीच्या संघात गेला होता. पण, 2018 मधील लिलावात त्याला पुन्हा राजस्थानच्या संघात घेण्यात आलं. आता 2021 मध्ये त्याला संघाच्या कर्णधारपदी निवडण्यात आलं. त्याला यंदाच्या वर्षी 8 कोटी रुपये इतकं मानधन मिळणार आहे.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली, यंदाच्या वर्षीसुद्धा सर्वाधिक महागडा कर्णधार सिद्ध होत आहे. 2008 मध्ये कोहलीला अवघ्या 20 लाख रुपयांच्या बोलीवर निवडण्यात आलं होतं. 2021 मध्ये त्याची किंमत 17 कोटी रुपये इतकी आहे.
महेंद्रसिहं धोनी, याच्याकडे चेन्नईच्या संघाचं कर्णधारपद असून, त्याचं मानधनही 15 कोटी रुपये इतकंच असणार आहे.
मुंबईच्या कर्णधारपदी असणाऱ्या आणि यशस्वी कर्णधारांच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या रोहित शर्मा याचं यंदाचं मानधन आहे 15 कोटी रुपये
आयपीएल 2021 मध्ये सर्व कर्णधारांच्या तुलनेत कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयोन मोर्गन याचं मानधन सर्वाधिक कमी आहे. कोलकात्याच्या संघानं मागील वर्षी त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं. यंदाच्या वर्षी त्याला 5.25 कोटी रुपये इतकं मानधन मिळणार आहे.
श्रेयस अय्यरनं यंदाच्या वर्षी दुखापतीमुळं आयपीएललमधून काढता पाय घेतल्यानंतर ऋषभ पंतकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. पंतचं यंदाचं मानधन आहे 8 कोटी रुपये