India Women vs Australia Women : टीम इंडियाच्या लेकींनी वानखेडेवर इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी विजय
भारतासाठी दुसऱ्या डावात स्मृती मानधनाने सहा चौकारांच्या मदतीने नाबाद 38 धावा केल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहिला क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.
याआधी दोन्ही देशांदरम्यान 10 कसोटी सामने खेळले गेले, ज्यामध्ये कांगारूंनी चार सामने जिंकले. तर सहा सामने अनिर्णित राहिले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 217 धावा केल्या.
ताहिला मॅकग्राने सर्वाधिक 50 आणि बेथ मुनीने 40 धावांचे योगदान दिले. भारताकडून पूजा वस्त्राकरला चार आणि स्नेह राणाला तीन यश मिळाले.
प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात 406 धावा केल्या. म्हणजेच पहिल्या डावाच्या आधारे भारताला 189 धावांची आघाडी मिळाली. दीप्ती शर्माने 78 आणि स्मृती मानधनाने 74 धावा केल्या.
ऋचा घोष आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनीही अर्धशतकी खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून ऍशले गार्डनरने चार विकेट घेतल्या.
187 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत 261 धावा करण्यात यश मिळवले.
ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या डावातही ताहिला मॅकग्राने सर्वाधिक 73 आणि अॅलिसा पेरीने 45 धावा केल्या. फिरकीपटू स्नेह राणाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
हरमनप्रीत कौर आणि राजेश्वरी गायकवाड यांनाही प्रत्येकी दोन यश मिळाले.