PHOTO : तब्बल 160 किलो वजनाच्या महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म
छत्रपती संभाजीनगर शहरातील डॉक्टरांनी तब्बल 160 किलो वजनाच्या महिलेची गुंतागुंतिची प्रसूती यशस्वी करण्याची किमया केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठवाड्यातील सर्वात वजनदार महिलेची ही दुसरी प्रसूती समजली जात आहे.
यापूर्वी शासकीय घाटीतील स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागात 162 किलो वजनाच्या महिलेची प्रसूती करण्यात आली होती.
त्यानंतर आता शहरातील एका खाजगी रुग्णालयात 160 किलो वजनाच्या महिलेची प्रसूती करण्यात आली आहे.
या तीस वर्षीय महिलेस लग्नानंतर आठ वर्षांनी गर्भधारणा झाली. अतिवजनामुळे सोनोग्राफीत गर्भातील बाळ व्यवस्थित दिसत नव्हते.
विशेष म्हणजे, या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून दोघांचीही प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
स्थूल महिलांची प्रसूती बहुतांशी वेळी अधिक गुंतागुंतीची असते, त्यामुळे यासाठी डॉक्टरांनी विशेष काळजी घ्यावी लागते.
दरम्यान, शहरातील बाबा पेट्रोलपंप परिसरातील असलेल्या एका खाजगी रुग्णालयात तब्बल 160 किलो वजनाच्या महिलेची प्रसुती सुखरूप पार पडली.