Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शेवटच्या सेकंदापर्यंत थरार, स्पेनचा वार पलटवला, टीम इंडियानं पॅरिसमध्ये कांस्य जिंकत विजयाचा झेंडा रोवला
Indian Hockey Team, Paris olympic : पॅरीस ऑलंम्पिकमध्ये हॉकी क्रीडा प्रकारात भारत आणि स्पेन दरम्यान कांस्य पदकासाठी सामना पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारताला सेमी फायनलमध्ये जर्मनीविरोधात पराभव स्वीकारावा लागला होता, तिथे भारताचं मोठं स्वप्न भंगलं होतं. मात्र, भारतापुढे कांस्य पदक पटकावण्याची संधी होती.
भारत आणि स्पेनमध्ये कांस्य पदकासाठी रंगलेल्या सामन्यात भारताने विजय मिळवलाय.
भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि गोलकीपर श्रीजेशच्या कामगिरीच्या जोरावर भारताने कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याने दोन गोल केले.
तर गोलकीपर श्रीजेश याने भक्कम बचाव करत प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्यापासून रोखलं.
दरम्यान, कांस्य पदक पटकावल्यानंतर भारताचा गोलकीपर श्रीजेश यांना निवृत्ती जाहीर केली आहे.
एका छोट्या मुलापासून भारताच्या सन्मानाचं रक्षण करणारा व्यक्ती हा प्रवास असाधारण होता, अशी प्रतिक्रिया श्रीजेश यांने सामना संपल्यानंतर व्यक्त केली आहे.
जर्मनीविरुद्ध पराभव झाल्यानंतर भारताचं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगल मात्र, कांस्य पदका जिंकण्यासाठी भारताकडे संधी होती.
विनेश फोगाट हिला वजन कमी भरल्यामुळे बाद करण्यात आल्यानंतर भारतीय चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती. मात्र, आज हॉकी संघाच्या कामगिरीनंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.