Riteish Deshmukh Fees : बिग बॉस मराठीसाठी रितेश देशमुखची एका एपिसोडसाठी फी 40 लाख?

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता रितेश देशमुख सहा ते सात कोटी रुपये आकारतो, त्यामुळेच बिग बॉस मराठीच्या होस्टसाठी त्याने तेवढी रक्कम आकारल्याची अपेक्षा आहे.

(pc:riteishd/ig)

1/10
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) नव्या सीझनला धूमधडाक्यात सुरुवात झाली असून पहिल्या आठवड्यापासूनच हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसत आहे.
2/10
यंदाचा बिग बॉस काहीसा वेगळा पाहायला मिळणार आहे. यंदा बिग बॉस मराठीची थीम चक्रव्युह आहे.
3/10
या चक्रव्युहात स्पर्धक सहभागी झाले आहेत. 28 जुलैपासून सुरु झालेल्या या शोला बिग बॉस प्रेमींचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
4/10
यंदाचा सीझन आणखी एका कारणामुळे वेगळा आहे, कारण यंदाच्या सीझनमध्ये महाराष्ट्राचा लाडका भाऊ अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. रितेश भाऊला होस्टच्या भूमिकेत पाहून प्रेक्षक आनंदी आहेत.
5/10
दोन वर्षांपूर्वी बिग बॉस मराठीचा चौथा सीझन आला होता. त्यानंतर बिग बॉस मराठी 5 ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत होते.
6/10
त्याशिवाय या शोमध्ये रितेश देशमुख होस्टच्या भूमिकेत दिसत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझनचा नवीन घर अनेक नवीन स्पर्धक, नवीन होस्ट, नवीन थीमसह सुरु झाला आहे.
7/10
बिग बॉस मराठी 5 च्या ग्रँड प्रीमियरपासून आतापर्यंत यंदाच्या सीझनमध्ये बरीच धमाल पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्पर्धक आता गेममध्ये तडका लावताना दिसत आहे.
8/10
यंदा बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी, वर्षा उसगावकर, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, एरिना रुडाकोवा, धनंजय पोवार, धनश्याम दरोडे, निखिल दामले, जान्हवी किल्लेकर, पंढरीनाथ कांबळे हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. यंदा होस्टच्या भूमिकेत रितेश देशमुख दिसत आहे.
9/10
महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठी शोला निरोप दिला असून यंदा रितेश देशमुख होस्टच्या भूमिकेत दिसत आहेत. महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीच्या होस्टची धुरा सांभाळली होती. बिग बॉस मराठी तिसरं सीझन होस्ट करण्यासाठी महेश मांजरेकर यांनी 25 लाख रुपये आकारले होते. गेल्या सीझनमध्ये त्यांनी 3.5 कोटी कमावले होते.
10/10
दरम्यान, काही मीडिया रिपोर्टनुसार, रितेश देशमुख बिग बॉस मराठी 5 साठी प्रत्येक एपिसोडसाठी 40 लाख रुपये मानधन घेत असल्याचं सांगितलं जात आहे. हा शो जवळपास 14 आठवडे चालतो त्यानुसार, रितेश भाऊची फी सुमारे 5.6 कोटी होईल, असा अंदाज आहे.(pc:riteishd/ig)
Sponsored Links by Taboola