अजित पवार प्रभू श्रीराम चरणी लीन, विधानसभेआधी देवदर्शनाचा धडाका, पाहा PHOTOS
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, नितीन गडकरी, गिरीश महाजन यांच्यानंतर अजित पवार यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेतले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअजित पवार यांनी पहिल्यांदाच काळाराम मंदिराचे दर्शन घेतल्याची माहिती विश्वस्तांनी दिली आहे.
महिला, शेतकरी संवाद यांच्या सोबतच अजित पवारांचे देवदर्शन सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांकडून देव दर्शनाचा धडाका सुरु असल्याचे दिसून येत आहे.
दिंडोरीमधील मेळावा, सह्याद्री फार्म मध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर अजित पवार श्रीरामाच्या चरणी लीन झाले.
अजित पवारांनी काळारामाचे दर्शन घेताना सर्वांचं भलं कर अशी प्रार्थना केली.
अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.