प्रेमाची फिरकी; युजवेंद्र चहल- धनश्रीच्या साखरपुड्याचे फोटो पाहिले?
भारतीय क्रिकेट संघात युजवेंद्रनं त्याच्या कामगिरीच्या बळावर फार कमी वेळातच लोकप्रियता मिळवली आहे. तर, त्याची पत्नी हीसुद्धा युट्यूब क्षेत्रात तिची वेगळी ओळख प्रस्थापित करुन यशस्वी आहे. धनश्री आणि युजवेंद्र हे दोघंही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असल्यामुळं या वर्तुळात त्यांना नेटकऱ्यांची सतत पसंती मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुजवेंद्र आणि धनश्रीच्या विवाह आणि साखरपुडा समारंभातील हे क्षण पाहता ही जोडी सर्वांच्याच मनात घर करत आहे, असं म्हणायला हरकत नाही.
यंदाच्याच वर्षी या दोघांची रिंग सेरेमनी पार पडली होती, ज्याची माहिती युजीनंही दिली होती.
युजीची युट्यूबर पत्नी धनश्री वर्मा (dhanashree verma) ही या फोटोमध्ये अतिशय सुरेख, जणू एखाद्या राजकुमारीप्रमाणं दिसत आहे. अतिशय समर्पक असं कॅप्शन देत तिनं हे फोटो पोस्ट केले आहेत.
एकमेकांच्या प्रेमाच्या नात्यावर शिक्कामोर्तब करणारी ही जोडी आणि त्यांचे हे फोटो सध्या कमालीचे व्हायरल होत आहेत.
विवाहसोहळ्याच्या निमित्तानं त्याच्यावर होणारा शुभेच्छांचा वर्षाव थांबत नाही, तोच आता या जोडीनं त्यांच्या साखरपुडा समारंभातील अर्थात Engagement Ceremonyचे फोटोही सर्वांच्या भेटीला आणले आहेत.
(सर्व छायाचित्रं- इन्स्टाग्राम)
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूही लग्नसराईच्या या उत्साही वातावरणापासून दूर नाहीत. नुकतच संघातील गोलंदाज युजवेंद्र चहल (yuzvendra chahal) यानं त्याच्या विवाहसोहळ्यातील फोटो शेअर करत आपल्या जीवनातील नव्या प्रवासाबाबत माहिती दिली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -