In Pics : ...असं सुरु आहे सेलिब्रिटींचं 'वर्क फ्रॉम होम'
शाहरुख प्रमाणंच त्याची पत्नी गौरी हिच्यासाठीसुद्धा त्यांच्या आलिशान घरात काम करण्यासाठी स्वतंत्र जागा आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरीसुद्धा काम करण्यासाठी एक वेगळी जागा आहे. इथं अनेक पुस्तकांचा संग्रह आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
लेखिका, इंटेरियर डिझायनर, निर्माती अशा अनेक भूमिका पार पाडणारी खिलाडी कुमारची पत्नी, ट्विंकल खन्नाही हल्लीच्या दिवसांमध्ये वर्क फ्रॉम होमलाच प्राधान्य देत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेता शाहरुख खानचं ऑफिस हे खास आहे तिथं असणाऱ्या लेदर सोफा आणि वुडन वॉल्समुळं. इथं त्याचे अनेक पुरस्कारही ठेवण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार याच ठिकाणी शाहरुख त्याच्या सर्व चित्रपटांची स्क्रीप्ट ऐकतो. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुनच काम करण्याची मुभा दिली. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करत हे पाऊल उचलण्यात आलं. अद्यापही अनेक कंपन्या याच निर्णयावर ठाम आहेत. वर्क फ्रॉ़म होमच्या या नव्या ट्रेंडपासून अगदी लोकप्रिय सेलिब्रिटीही मागे राहिले नाहीत. बी- टाऊनमधील अनेक बड्या सेलिब्रिटींनी या दरम्यानच्या काळात त्यांच्या घरातच थाटलेल्या आलिशान ऑफिसमधून काम करणं सुरु ठेवलं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
सुझान खान हिसुद्धा तिच्या घरुनच अनेक कामं करते. यासाठी तिच्या घरात अतिशय सुरेख अशी एक निर्धारित जागा आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -