त्यानं झाडू मारला, बापानं सिलिंडर विकले, त्याच रिंकू सिंहने घेतला करोडो रुपयांचा आलिशान बंगला; डोळे दिपवणारं घर पाहून थक्क व्हाल!

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू रिंकु सिंह महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. अपार मेहनतीच्या जोरावर आज तो यशाच्या शिखरावर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
घरची परिस्थिती हलाखीची असताना त्याने रात्रंदिवस एक करून क्रिकेटविश्वात आपलं नाव कमावलं आहे.

त्याच्या करिअरची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स या संघापासून झाली. या संघाकडून खेळून त्याने आपल्या खेळाची जादू दाखवत सर्वांचच मन जिंकलं.
पण त्याचे सुरुवातीच दिवस फारच खडतर होते. त्याचे वडील मुलांना जगवण्यासाठी सिलिंडर विकायचे तर खुद्द रिंकू सिंहनेही वेळप्रसंगी झाडू मारणे साफसफाई करण्याचे काम केलेले आहे.
आता मात्र भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाल्यानंतर तसेच आयपीएलमध्ये कोट्यवधी रुपयांची बोली लागल्यानंतर त्याने आता करोडो रुपयांचा आलिशान विला खरेदी केला आहे.
या आलिशान विलाचे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. रिंकू सिंहची बहीण नेही सिंहने आपल्या यूट्यूब चॅनेलवर रिंकू सिंहने खरेदी केलेल्या व्हिलाचा एक ब्लॉग पोस्ट केला आहे. या ब्लॉगमध्ये तिने रिंकू सिंहच्या घराची माहिती दिली आहे.
रिंकू सिंहचे हे घर सर्व सोईसुविधांनी युक्त आहे. मोठे बेडरुम्स, एसी, पोहण्यासाठी छोटासा स्विमिंग पूल, घरासमोर मोठं गर्डन अशा सगळ्या सुविधा त्याच्या घरात आहेत.
रिंकू सिंहच्या घराचे हे फोटो पाहून अनेकांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. रिंकू सिंहच्या मेहनतीला लोक सलाम करत आहेत.
रिंकू सिंहचे घर