Congress : काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाच्या शतकमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, गांधी कुटुंबीय उपस्थित राहणार
काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाचे यंदा शतकमहोत्सवी वर्ष असून त्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे हे या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने बेळगाव शहरातील चौका चौकात विद्युत रोषणाई करण्यात आली असून महापुरुष आणि वेगवेगळ्या प्रसिद्ध स्थळे विद्युत रोषणाईने साकारण्यात आली आहेत.
महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बेळगाव येथील काँग्रेस अधिवेशनाचा 100 वा वर्धापन दिन गुरुवारी 26 आणि शुक्रवारी 27 डिसेंबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे.
सन 1924 मध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या शताब्दी निमित्त गुरुवारी बेळगाव येथे काँग्रेस कार्यकारिणीची काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत 2025 साठी पक्षाच्या कृती आराखड्याची निर्मिती केली जाणार आहे.
देशातील 200 नेत्यांचा सहभाग असणाऱ्या या बैठकीला ‘नवसत्याग्रह’ बैठक असे नाव देण्यात आले आहे. याच दिवशी रामतीर्थनगर येथील गंगाधरराव देशपांडे स्मारकाचा अनावरणाचा कार्यक्रम होईल.
वीरसौधजवळ दुपारी 3 वाजता काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक होणार असून रात्री 7 वाजता अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC) अध्यक्षांच्यावतीने मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते सुवर्णसौध येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.
त्यानंतर ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली होणार आहे. शहरातील सीपीएड कॉलेज मैदानावर दुपारी 1 वाजता जाहीर सभा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्यावतीने मेजवानेचे आयोजन करण्यात येणार आहे.