India vs Qatar FIFA World Cup 2026 Qualifier: वादग्रस्त निर्णयाचा टीम इंडियाला फटका; कतारकडून पराभव, विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर
भारतीय फुटबॉल संघ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या पात्रता फेरीत पराभूत झाला आहे. वास्तविक, मंगळवारी रात्री कतारविरुद्धच्या वादग्रस्त गोलमुळे टीम इंडियाचा कतारकडून पराभव झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कतारकडून 2-1 असा पराभव झाला. मात्र, खराब रेफ्रींमुळे भारत फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. अशा प्रकारे टीम इंडिया इतिहास रचण्यात मुकली आहे.
37व्या मिनिटाला ललियानजुआला चांगटेने भारतासाठी गोल केला. या गोलमुळे टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर होती, पण खराब रेफरींगचे परिणाम त्यांना भोगावे लागले.
वास्तविक, शेवटच्या क्षणी कतारसाठी युसेफ आयमनने गोल केला. असे वाटले की ते रेषेच्या बाहेर गेले आहे, परंतु रेफरीने गोल वैध घोषित केला. त्यामुळे भारतीय संघ इतिहास रचण्यात मुकला.
आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत. तसेच चाहत्यांचे म्हणणे आहे की, भारताला अन्यायकारक वागणूक दिली गेली, असे झाले नसते तर टीम इंडिया इतिहास रचण्यात यशस्वी ठरली असती.
मॅच रेफरीने दिलेल्या या वादग्रस्त निर्णयामुळे सोशल मीडियावार वादाला तोंड फुटलं आहे. फुटबॉल चाहत्यांनी या निर्णयाविरुद्ध जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
ही संपूर्ण घटना ७३ व्या मिनिटाला घडली. अशा प्रकारे दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आले. मात्र वादग्रस्त निर्णयानंतर भारतीय खेळाडूंची लय बिघडली. त्यामुळे 85व्या मिनिटाला कतारने पुन्हा गोल केला. अशाप्रकारे कतार संघ 2-1 ने पुढे गेला. तसेच, कतारने 2-1 असा विजय मिळवत पुढील फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
अन्य एका सामन्यात कुवेतने अफगाणिस्तानचा 1-0 असा पराभव केला. अशाप्रकारे कतार वगळता कुवेतने पुढील फेरी गाठली असली तरी भारतीय संघाचे स्वप्न भंगले आहे.