India WTC 2021 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची उत्सुकता, भारतीय संघाची जोरदार तयारी
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारताच्या 15 सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी संध्याकाळी ही माहिती दिली
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App18 जूनपासून इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ तयार झाले आहेत.
विराट कोहली आणि केन विल्यमसन यांचे लक्ष आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स करंडक जिंकण्याकडे लागले आहे. त्याआधीच्या सराव सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली.
हित शर्मा आणि शुभमन गिल अंतिम सामन्यात ओपनिंग करु शकतात. त्यानंतर अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि हनुमा विहारी मधल्या फळीला बळकटी देतील.
ऋषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून संधी मिळू शकेल, कारण तो या क्षणी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचं तर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळतील. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाजीची भक्कम करतील.
ऋषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून संधी मिळू शकेल, कारण तो या क्षणी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचं तर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळतील. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाजीची भक्कम करतील.
मात्र जर टीम इंडिया चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू घेऊन मैदानावर उतरली तर जाडेजाला बाहेर बसावे लागेल आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळू शकेल.
भारतीय संघाने अंतिम सामन्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. अनेक दिवसांपासून टीम सतत सराव करत आहे. इंग्लंडच्या मैदानावर अधिकाधिक सराव करून खेळाडू तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अंतिम सामन्यादरम्यान हवामान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. (सर्व फोटो बीसीसीआयच्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरुन घेतले आहेत.)