PHOTO : अभिनेत्री गीता बसराचं व्हर्च्युअल बेबी शॉवर
बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा आणि भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहच्या घरी लवकर आंनदाची वार्ता येणार आहे. हरभजन आणि गीता यांना लवकरच दुसरं अपत्य होणार आहे. (Photo instagram @geetabasra)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांनी काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. नव्या पाहुण्यासाठी गीता-हरभजनच्या घरी बेब शॉवरचं आयोजन करण्यात आलं होतं. (Photo instagram @geetabasra)
गीता बसराने या क्युट बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या दाम्पत्याच्या मित्रपरिवाराने व्हर्च्युअल बेबी शॉवरचं आयोजन केलं होतं.(Photo instagram @geetabasra)
बेबी शॉवरच्या फोटोंमध्ये गीता फारच सुंदर दिसत आहे. निळ्या रंगाच्या पोलका डॉट ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य आणखी बहरुन आलं आहे. (Photo instagram @geetabasra)
या बेबी शॉवरसाठी असलेला केकही खास होता. गीता, हरभजन, त्यांनी मुलगी आणि बाळ असा हा केक आहे. (Photo instagram @geetabasra)
गीता बसरा आणि हरभजन सिंहचे हे फोटो चाहत्यांना पसंतीस उतरत आहेत. सोबतच चाहते येणाऱ्या बाळासाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. (Photo instagram @geetabasra)
गीता बसरा आणि हरभजन सिंह यांनी 2015 लग्न केलं होतं. गीताने 27 जुलै 2016 रोजी हिनायाला जन्म दिला.(Photo instagram @geetabasra)
आता त्यांच्या दुसऱ्या बाळाचा जन्मही जुलै महिन्यातच होणार आहे.(Photo instagram @geetabasra)