Vitthal-Rukmini Mandir : दसऱ्या दिवशी विठुराया बनला 'गुराखी', तर रुक्मिणी विजयलक्ष्मीच्या रूपात; सोने आणि हिरे माणकांची आरास
आज दसरा , साडेतीन मुहूर्तातील एक , आजच्या सोहळ्या निमित्त विठुरायाला पारंपरिक पद्धतीने गुराख्याच्या पोशाखात सजविण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरुक्मिणी मातेला नखशिखांत सोन्याने मढविलेल्या विजयलक्ष्मीच्या रूपात पूजा बांधण्यात आली आहे.
विठुरायाला आज सोन्याचे धोतर , खांद्यावर खास रेशमी घोंगडी, सोन्याची घोंगडी, डोक्यावर सोन्याची पगडी, त्यावर मोरपीस आणि हातात चांदीची काठी असे अनोखे रूप देण्यात आले होते .
रुक्मिणी मातेला आज दसऱ्याच्या दिवशी सोन्याची साडी आणि नखशिखांत सोन्याच्या दागिन्याने मढविण्यात आले होते.
गेले नऊ दिवस सुरु असलेल्या नवरात्र महोत्सवात रोज विठुराया आणि रुक्मिणी मातेला विविध पोशाखात नटविण्यात येत होते.
मात्र आज दसऱ्याला अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविलेले देवाचे हे रूप पाहण्यासाठी हजारो भाविकांनी विठ्ठल मंदिरात गर्दी केली आहे.
आजच्या दिवशी विठुरायाच्या दर्शनाने पुढील संपूर्ण वर्ष भरभराटीचे आणि सुख शांतीचे जाते अशी भाविकांची भावना असते.
दसराच्या निमित्ताने भाविकांचे मनमोहक रुप पाहायला मिळाले.
दसऱ्या दिवशी विठुराया बनला 'गुराखी', तर रुक्मिणी विजयलक्ष्मीच्या रूपात पाहून भक्तांची मनं प्रफुल्लीत झाली.
दरवेळी प्रमाणे याहीवर्षी विठुराया आणि रुक्मिणीच्या मूर्तीला सजावट करण्यात आली होती