IND vs AUS W : स्मृती मानधनाच्या खेळीनं भारत भक्कम स्थितीत
Smirti Mandhana : भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधनानं विक्रम केला आहे. ती पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची स्थिती मजबूत आहे.(photo courtesy sony liv)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये (India vs Australia) सुरु असलेल्या एकमेव पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली आहे.(photo courtesy sony liv)
स्मृतीच्या (Smriti Mandhana) शतकाचा समावेश आहे. स्मृती मानधानने सर्वोत्कृष्ट खेळी करत पहिल्या दिवसअखेर नाबाद 80 धावा पहिल्या दिवशी केल्या आहे. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवण्यात आला होता. पहिल्या दिवशी एक विकेटच्या बदल्यात 132 धावा केल्या होत्या. भारताची सलामीवीर शफाली 64 चेंडूत 31 धावा केल्या.(photo courtesy sony liv)
स्मृती मानधना ही मूळची सांगलीची असून तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी बहुमुल्य कामगिरी केली आहे. (Photo: @mandhanasmriti18/FB)
दरम्यान महिला क्रिकेटच्या इतिहासात प्रकाशझोतात खेळवला जाणारा हा दुसराच कसोटी सामना आहे. तर भारतीय संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर खेळत आहे
याआधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात 9 ते 12 नोव्हेंबर 2017 साली पहिला डे-नाईट सामना खेळवण्यात आला होता. हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला होता.