Smirti Mandhana : मराठमोळ्या स्मृतीनं उंचावली भारताची 'मान', ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी
Smirti Mandhana : भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधनानं विक्रम केला आहे. (Photo: @mandhanasmriti18/FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्मृती पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.(Photo: @mandhanasmriti18/FB)
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये (India vs Australia) सुरु असलेल्या एकमेव पिंक बॉल कसोटी सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली आहे.(Photo: @mandhanasmriti18/FB)
स्मृती मानधानने सर्वोत्कृष्ट खेळी करत पहिल्या दिवसअखेर नाबाद 80 धावा पहिल्या दिवशी केल्या आहे. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवण्यात आला होता.(Photo: @mandhanasmriti18/FB)
पहिल्या दिवशी एक विकेटच्या बदल्यात 132 धावा केल्या होत्या. भारताची सलामीवीर शफाली 64 चेंडूत 31 धावा केल्या. भारताची सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मानं 93 धावांची दमदार सलामी दिली.(Photo: @mandhanasmriti18/FB)
शफाली बाद झाल्यानंतर आलेल्या पूनम राऊत सोबत स्मृती मानधनानं भारताच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली. स्मृतीनं शानदार 127 धावांची खेळी केली. (Photo: @mandhanasmriti18/FB)
स्मृती मानधना ही मूळची सांगलीची असून तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी बहुमुल्य कामगिरी केली आहे. (Photo: @mandhanasmriti18/FB)