पतीने 9 अन् पत्नीने 6 पदके जिंकली; ऑलिम्पिकमधील सर्वात यशस्वी जोडपं, पहिल्या भेटीत काय घडलं?
Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमधील सर्वात यशस्वी पती-पत्नीच्या जोडीची चर्चा रंगली आहे.

Paris Olympics 2024
1/6
Paris Olympics 2024: आगामी 26 जुलैपासून पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यामध्ये जगभरातील अनेक देश सहभागी होतील. याचदरम्यान ऑलिम्पिकमधील सर्वात यशस्वी पती-पत्नीच्या जोडीची चर्चा रंगली आहे.
2/6
जॅसन केनी इंग्लंडमधील खेळाडू आहे. जॅसन केनीने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकुण 9 पदके जिंकले आहेत. यामध्ये 7 सुवर्णपदकं आहेत.
3/6
जॅसन केनीची पत्नी लॉरा केनी देखील दिग्गज सायकलपटू आहे. लॉराने ऑलिम्पिकमध्ये एकुण 6 पदके जिंकली आहेत. यामध्ये 5 सुवर्णपदकांचा समावेश आहे.
4/6
लॉराने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, दोघांची पहिली भेट चांगली नव्हती. कारण पहिल्या भेटीत जॅसन तिच्यापेक्षा जास्त कॉफीकडे लक्ष देत होता.
5/6
काही महिने लोटल्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
6/6
2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकनंतर जॅसन आणि लॉराने विवाह केला. त्यामुळे जॅसन आणि लॉरा ऑलिम्पिकमधील सर्वात यशस्वी जोडपे झाले.
Published at : 17 Jul 2024 11:30 AM (IST)