Vastu Tips : घरातील 'या' दिशेला कधीच चपला-बूटं ठेवू नका; देवी लक्ष्मी होईल नाराज, हातातून पैसाही पाण्यासारखा वाहत जाईल

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार, घरातील मुख्य दरवाजातून देवी लक्ष्मीचं आगमन होते त्यामुळे घरातील चपला-बूटं कधीच दाराजवळ काढून ठेवू नयेत.

Continues below advertisement

Vastu Tips

Continues below advertisement
1/8
अनेकदा आपण पाहिलं असेल की, घरातील चपला या मुख्य दरवाजाच्या शेजारी किंवा कुठेही ठेवतात. पण असं करणं अशुभ आहे.
2/8
वास्तूशास्त्रानुसार, घरात चपला, बूटं काढण्याची देखील एक विशेष जागा आहे. आणि ते त्याच ठिकाणी ठेवणं अपेक्षित आहे.
3/8
असे केल्याने घरात वादविवाद, संकटं किंवा कोणत्याही प्रकारच्या वादाला बळी पडतो. तसेच, घरात पैशांची देखील तंगी भासते.
4/8
वास्तूशास्त्रानुसार, चपला, बूट नेहमी घराच्या उत्तर-पश्चिम दिशेला असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही घराच्या पश्चिम दिशेला देखील ठेवू शकता.
5/8
घरातील मुख्य दरवाजातून देवी लक्ष्मीचं आगमन होते त्यामुळे घरातील चपला-बूटं कधीच दाराजवळ काढून ठेवू नयेत.
Continues below advertisement
6/8
जर, तुम्ही घराच्या मुख्य दारी चपला, बूटं काढल्या तर देवी लक्ष्मी नाराज होते. तसेच, घरात पैसाही टिकून राहत नाही.
7/8
तसेच, अशा घरात सकारात्मक ऊर्जेचा देखील वावर होत नाही. त्यामुळे चपला घराच्या उत्तर-पश्चिम दिशेलाच ठेवाव्यात.
8/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola