Govinda : खूप खोटं बोलायचा,अंधश्रद्धाळू झालेला गोविंदा, निर्मात्यानं सांगितली 'हिरो नं.1' च्या डाऊनफॉलची कारणं
चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी गोविंदाच्या कारकिर्दीतील डाऊनफॉल बद्दल भाष्य केले आहे. गोविंदा प्रचंड अंधश्रद्धाळू झाला होता, त्यामुळे लोकांना त्याच्यासोबत काम करणे कठीण झाले होते, असा दावाही निहलानी यांनी केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'फ्रायडे टॉकीज'शी बोलताना निहलानी यांनी सांगितले की, 'तो हळूहळू अंधश्रद्धाळू होऊ लागला होता. तो नेहमी इतरांवर सहज विश्वास ठेवायचा. सेटवर झुंबर पडणार आहे असे म्हणायचा आणि सगळ्यांना दूर जायला सांगायचा.
पहलाज पुढे म्हणाले की, 'तेव्हा तो कादर खान बुडणार असल्याचा अंदाज वर्तवत होता. तो लोकांना कपडे बदलण्याची सूचना देत असे. ठराविक दिवशी ठराविक काम करायला तो नकार देत असे. या सर्व गोष्टींमुळे तो आळशी झाला. हेच त्याच्या पतनाचे कारण ठरले असल्याचे पहलाज निहलानी यांनी सांगितले.
निहलानी यांनी सांगितले की, 'आमचा संबंध होता, पण त्याच्यासोबत काम करण्याबाबत अनिश्चितता होती. तो विचार न करता अनेक बी-ग्रेड आणि सी-ग्रेड चित्रपट साइन करत असे. ते एकावेळी 5-6 चित्रपटात काम करायचा.
गोविंदा कुठे आहे हे कोणालाच माहीत नव्हते. तो नेहमी उशीरा आणि खोटे बोलत असे. पैशासाठी हे करत असल्याचे तो सांगायचा असे निहलानी यांनी सांगितले. मी म्हटले की हे धोकादायक आहे. गोविंदा हा आपल्या प्रोफेशनच्या विरोधात वागत होता.
पहलाज आणि गोविंदा यांनी 'आँखे', 'इल्जाम' आणि 'शोला और शबनम' सारखे चित्रपट केले आहेत. 2019 मध्ये 'रंगीला राजा' या चित्रपटात त्यांनी शेवटचे काम केले होते.
पहलाज यांनी गोविंदाचे कौतुकही केले. गोविंदा एक चांगला अभिनेता आणि एक चांगली व्यक्ती आहे. तो भावनिक आणि कौटुंबिक माणूस आहे. पण लोकांवर पटकन विश्वास ठेवण्याच्या सवयीने त्याचा घात झाला असल्याचे त्यांनी म्हटले.