Hardik Pandya :व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हार्दिक आणि नताशा पुन्हा विवाहबद्ध, पाहा फोटो
हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. हार्दिक आणि नताशा हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट आउटफिटमध्ये दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनताशाने तिच्या लग्नात सुंदर पांढरा गाऊन परिधान केला आहे. केसांमध्ये बन आणि गळ्यात नेकलेस घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
हार्दिक ब्लॅक सूट परिधान केला होता. या लूकमध्येही तो नेहमीप्रमाणे डॅशिंग दिसत होता.
या फोटोत हार्दिक आणि नताशा हे त्यांच्या मुलासोबत दिसत आहेत. चाहत्यांनी या फोटोवर लाइक्सचा वर्षाव केला आहे.
हार्दिकने म्हटले की, तीन वर्षापूर्वी कमिटमेंट घेतली होती. आज 'व्हॅलेंटाईन डे'ला याची पुनरावृत्ती करत आहोत. या सेलिब्रेशनमध्ये मित्र आणि कुटुंबीय सोबत असल्याने आनंद आणखी द्विगुणित झाला आहे.
हार्दिक आणि नताशाने दुसऱ्यांदा विवाह केला आहे. पहिल्यांदा तीन वर्षांपूर्वी त्यांनी कोर्ट मॅरेज केले होते. (सर्व फोटो इन्स्टाग्राम : hardikpandya93)