खरी हिम्मतवान! 30 फूट खोल विहिरीतून महिलेने केली बिबट्याची सुटका, एकाच पिंजऱ्यात होते दोघेजण
बिबट्या म्हटल्यावर अनेकांच्या मनात धडकी भरते. मात्र, 31 वर्षीय वन्यजीव पशू डॉक्टर मेघना पेम्मया यांची सध्या जोरादार चर्चा सुरू आहे. त्याला कारणही तसे खास आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकमधील मंगळुरुपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कटील गावातील निड्डोडीजवळ ही नाट्यमय घटना 12 फेब्रुवारी रोजी घडली.
प्रत्येक बचाव मोहीम ही आव्हानात्मक असते. मात्र, विहिरीतून बिबट्याची सुटका करणे हे अधिकच आव्हानात्मक होते, असे त्यांनी म्हटले.
बिबट्याला कोणतीही इजा न करता, त्याची सुखरूप सुटका करण्याचे आव्हान होते, असे डॉ. मेघना यांनी म्हटले.
सुदैवाने डार्ट मारताना बिबट्या योग्य पद्धतीने बसला होता. त्यामुळे त्याला बेशुद्ध करणे काहीसे सोपं गेलं असल्याचे त्यांनी सांगितले.
बिबट्या माझ्यासोबतच्या पिंजऱ्यात होता, त्यावेळी मनात असलेली भावना व्यक्त करू शकत नाही, असे डॉ. मेघना पेम्मया यांनी म्हटले.
वनविभागाला आवश्यकता असते तेव्हा वन्य प्राण्यांच्या सुटकेसाठी डॉ. मेघना हजर असतात. आतापर्यंत त्यांनी 50 बिबट्यांची सुटका केली आहे.
डॉ. मेघना या बेंगळुरू येथील वन्यजीव औषध आणि शस्त्रक्रिया या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून डॉ. यशस्वी नरवी यांच्यासमवेत चित्ते पिल्ली संशोधन आणि बचाव केंद्रात सहा वर्षांपासून काम करत आहेत.