PHOTO : रोनाल्डो, मेस्सीनंतर सर्वाधिक गोल करण्याची किमया करणारा सुनिल छेत्री
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. (photo courtesy : @chetri_sunil11 Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुनिल छेत्रीचा जन्म 3 ऑगस्ट 1984 साली झाला. भारताकडून सर्वात जास्त गोल करण्याचा विक्रम सुनिल छेत्रीच्या नावावर आहे. (photo courtesy : @chetri_sunil11 Instagram)
आज जरी तो भारताचा स्टार खेळाडू असला तरी त्याला इथपर्यंतच्या प्रवासामध्ये पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. (photo courtesy : @chetri_sunil11 Instagram)
सुनिल छेत्री हा सध्या रोनाल्डो, मेस्सी आणि अली मबखाऊत या खेळाडूंच्या नंतर सर्वाधिक गोल करणारा आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. (photo courtesy : @chetri_sunil11 Instagram)
पोर्तुगालच्या लिस्बन संघाकडून खेळताना 2012 साली संघाच्या प्रशिक्षकांनी सुनिल छेत्रीला संघात राहण्याच्या लायक नसल्याचं म्हटलं होतं आणि त्याचा अपमान केला होता. (photo courtesy : @chetri_sunil11 Instagram)
सुनिल छेत्रीने आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमध्ये 118 सामन्यात 74 गोल केले आहेत. त्याच्या गोलची सरासरी ही 0.63 असून ती रोनाल्डो आणि मेस्सीपेक्षाही चांगली आहे. (photo courtesy : @chetri_sunil11 Instagram)
सुनिल छेत्रीची आई सुशीला छेत्री आणि त्याच्या जुळ्या बहिणी या आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहेत. या तिघीही नेपाळ नॅशनल फुटबॉल टीमच्या सदस्य होत्या. (photo courtesy : @chetri_sunil11 Instagram)
सुनिल छेत्री सहा वेळा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचा 'प्लेयर ऑफ द ईयर' ठरला आहे. (photo courtesy : @chetri_sunil11 Instagram)