सलीम दुराणींपासून ते राॅबिन सिंगपर्यंत! या 5 क्रिकेटपटूंचा जन्म परदेशात, पण देशासाठी खेळले
सध्या टीम इंडियामध्ये असा एकही क्रिकेटर नाही जो बाहेर जन्माला आला असेल, पण याआधी असे 5 क्रिकेटपटू होते जे परदेशी भूमीवर जन्मले आणि भारतासाठी सामने खेळले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1948 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खोखान सेन यांचा जन्म बांगलादेशातील कुमिल्ला येथे झाला. त्यांची जन्मतारीख 31 मे 1926 आहे.
सलीम दुर्रानी यांचा जन्म पाकिस्तानातील खैबर पास भागात झाला. त्यावेळी हा भाग केवळ अविभाजित भारताच्या अंतर्गत आला होता. सलीम दुर्रानी यांचा जन्म 11 डिसेंबर 1934 रोजी झाला. 1973 मध्ये त्यांनी भारतासाठी शेवटची कसोटी खेळली होती.
अशोक गंडोत्रा यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1948 रोजी ब्राझीलच्या रिओ दि जानेरो शहरात झाला. त्यांनी भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले.
लाल सिंह यांचा जन्म मलेशियातील क्वालालंपूर येथे झाला. त्यांची जन्मतारीख 16 डिसेंबर 1909 होती. 1932 मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला.
रॉबिन सिंग यांचा जन्म त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे झाला. त्यांनी भारतासाठी 136 एकदिवसीय सामने खेळले.