राज्यात उद्यापासून हवामानाची स्थिती काय असणार?
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठं थंडीचा कडाका पाहयला मिळत आहे. तर कुठं अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील तीन चार दिवसात राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं कहर केला आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
उद्या (2 डिसेंबर) मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात पूर्णतः उघडीप आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
खान्देश, नाशिकसह सोलापूर पर्यंतच्या 10 जिल्ह्यात उद्या शनिवार 2 डिसेंबर) पर्यंत ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
रविवारी 3 डिसेंबरपासून तिथे पूर्णतः उघडीप आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवेल असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात 4,5 डिसेंबर असे दोन दिवस फक्त ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
6 डिसेंबरपासून मराठवाड्यात पूर्णतः उघडीप आणि स्वच्छ सूर्यप्रकाश जाणवणार असल्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
विदर्भातील 11 जिल्ह्यात मात्र आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दिनांक 5 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणसहीत तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
4 डिसेंबरला तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश किनारपट्टी सीमावर्ती भागात आदळणारे ' मिचोंगं ' नावाचे सौम्य चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही विशेष वातावरणीय परिणाम जाणवणार नाही.