कतार फुटबॉल विश्वचषकाचं काऊंटडाऊन सुरु
कतारमध्ये सुरु होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकाचं काऊंटडाऊन सुरु झालंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्यापासून सुरु होणाऱ्या विश्वचषकासाठी जगभरातील ३२ संघ कतारमध्ये दाखल झालेत..
युरोप, दक्षिण आणि उत्तर अमेरिकेसह आशिया आणि आफ्रिकेतील फुटबॉल चाहते कतारमध्ये पोहोचलेत...
मात्र या फुटबॉल विश्वचषकासाठी कतारमध्ये प्रशासनाने कडक नियम लागू केलेत... बिकीनी, बियर आणि सेक्ससंदर्भात कतारमध्ये कडक नियमावली लागू करण्यात आलीय..
या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित फॅन्सची तुरुंगात रवानगी होऊ शकते. तसंच ड्रग्ज तस्करी केल्यास फाशीची शिक्षा होऊ शकते... कतारमधील या नियमांमुळे फुटबॉल चाहत्यांचा हिरमोड झालाय..
फिफा विश्वचषक कतारच्या दोहा येथील अल बायत स्टेडियमवर सुरूवात होणार आहे.
फुटबॉल विश्वचषक प्रथमच मध्यपूर्वेच्या देशात आयोजित केला गेलाय. विश्वचषक स्पर्धेत एकूण 32 देशांचे संघ सहभागी होत आहेत.
स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरूवात होणार आहे.
फिफा चा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता अल बायत स्टेडियममध्ये होणार आहे.
कतारमध्ये होणाऱ्या सोहळ्यात भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड सहभागी होणार आहेत.