Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फिटनेस पाहून थक्क व्हाल, शेअर केले व्यायाम करतानाचे फोटो
फुटबॉल जगतातील स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या सौदी अरेबियाच्या अल् नासर क्लबकडून खेळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफुटबॉल इतिहासीतील सर्वात मोठी डिल करुन रोनाल्डो या क्लबमध्ये गेला. तब्बल 200 मिलीयन युरोजमध्ये ही डिल झाली.
दरम्यान फुटबॉल विश्वचषकात पोर्तुगालचा संघ विजय मिळवू शकला नाही, पण त्यानंतर रोनाल्डोने इतिहासातील सर्वात मोठी डिल करत अल नासिर क्लबमध्ये प्रवेश केला.
या नव्या क्लबमध्ये तो नव्या सहकाऱ्यांसोबत मैदानात उतरला असून काही दिवसांपूर्वी मेस्सीच्या पीएसजी संघासोबत झालेल्या सामन्यात रोनाल्डोने दमदार कामगिरी केली होती.
रोनाल्डोने 2 गोल करत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती, पण पीएसजीने सामना 5-4 ने जिंकला होता.
दरम्यान आता रोनाल्डोने काही फोटो त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यामध्ये तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे.
विशेष म्हणजे फोटोंमध्ये रोनाल्डो अगदी फिट दिसत आहे. तो तितक्याच मेहनतीने व्यायाम करत आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फिटनेस पाहून कोणीही थक्क होईल. तो 37 वर्षांचा असूनही अगदी फिट दिसत आहे.
आता रोनाल्डो पुन्हा कधी मैदानात उतरेल याची चाहते वाट पाहत आहेत.
रोनाल्डो आगामी विश्वचषकात खेळण्याची शक्यता फारच कमी असली तरी फॅन्सना तो खेळावा अशी अपेक्षा आहे.