Beed : बीडमध्ये कृषी प्रदर्शन, तब्बल एक कोटींचा गजेंद्र रेडा चर्चेत
बीडमध्ये सध्या एक कोटींच्या गजेंद्र रेड्याची चर्चा सुरु आहे. हा रेडा गेवराईमध्ये सुरु असलेल्या कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कृषी प्रदर्शनामध्ये शेती अवजाराबरोबरच पशुप्रदर्शन देखील भरण्यात येतंय. शेतीला आधुनिकतेची जोड मिळावी, यासाठी या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
कधी अवकाळी तर कधी अतीवृष्टीचं संकट बळीराजाला सतावतं पण या अडचणींवरही कशी मात करता येवू शकते, हे सांगणारं हे प्रदर्शन आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिकतेची जोड धरुन जर शेतकऱ्यांनी काळी माती कसली तर नक्कीच भरघोस पीक हाती येईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
आधुनिक तंत्रज्ज्ञानाचं हेच महत्त्व पटवून देण्यासाठी या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही याचा फायदा करुन घ्यावा असं आवाहन केलं जातंय.
या प्रदर्शनात गजेंद्र रेड्याची चर्चा आहे. तो आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरलाय. हा रेडा पाहण्यासाठी देखील मोठी गर्दी या ठिकाणाचे नागरिक आणि शेतकरी करत आहेत..
या कृषी प्रदर्शनामध्ये शेती अवजाराबरोबरच पशुप्रदर्शन देखील भरण्यात येत त्यामुळे अनेक शेतकरी नवनवीन पशु ची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी येतात.
गेवराई सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. नवनवीन तंत्रज्ञानासह शेती अवजारांची माहिती दिली जात आहे. बीडच्या गेवराईमध्ये किसान कृषी प्रतिष्ठानच्या वतीने चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आलं आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून किसान कृषी प्रतिष्ठानच्या वतीने हे कृषी प्रदर्शन भरवलं जातं आहे. यामध्ये शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनेची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते.
त्यामुळे या कृषी प्रदर्शनात बीड जिल्ह्यातूनच नाहीतर महाराष्ट्रातून अनेक शेतकरी शेतीतील नवनवीन प्रयोग बघण्यासाठी सहभागी होतात. यावर्षीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
बीड सारख्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एक नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, म्हणून महेश बेंद्रे यांनी हे कृषी प्रदर्शन भरायला सुरुवात केली.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनातून शेतीतल्या नवीन तंत्रज्ञानाची अवजाराची माहिती मिळत आहे. शेकडो शेतकरी आणि नागरिक दररोज कृषी प्रदर्शनाला भेट देत आहेत.
सध्या सुरु असलेल्या प्रदर्शनात एक कोटींच्या गजेंद्र रेड्याची चर्चा आहे. गजेंद्र रेड्याला विविध राज्यातून मागणी आहे. गजेंद्र रेड्याचं वजन दीड टन इतके आहे. त्याला आहार म्हणून 3 किलो सफरचंदासह हिरवा चारा दररोज लागतो.