वरुण चक्रवर्ती-
आयपीएलच्या 13 व्या (IPL) हंगामात वरुण चक्रवर्ती या खेळाडूनं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सर्वांच्या नजरा वळवल्या. त्याला Australia ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी20 संघात स्थानही मिळालं होतं. पण, दुखापतीच्या कारणामुळं त्याला जाणं शक्य झालं नाही. त्याच्याऐवजी संघात टी नटराजनला जागा मिळाली. तेव्हा 2021 मध्ये वरुण संघात दिसणार हे जवळपास निश्चितच.
2/5
सूर्यकुमार यादव
इंग्लंडचा क्रिकेट संघ फेब्रुवारी महिन्यात चार कसोटी आणि पाच टी20 सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशा वेळी टी20 संघासाठी सूर्यकुमार यादवच्या नावाला प्राधान्य दिलं जाऊ शकतं. शिवाय त्याला एकदिवसीय संघाचाही भाग केलं जाऊ शकतं. गेल्या काही काळापासून आयपीएल आणि स्थानिक स्तरावरील क्रिकेटमध्ये त्याची उत्तम कामगिरी पाहायला मिळाली आहे.
3/5
रवी बिष्णोई -
भारतीय अंडर 19 क्रिकेट संघातील स्टार खेळाडू आणि फिरकी गोलंदाज रवी बिष्णोई आयपीएल 2020 मध्ये अनेकांची मनं जिंकून गेला. 2021 मध्ये भारतीय संघ श्रीलंका आणि झिम्बाब्वेसोबत द्वीपक्षीय सीरीज खेळणार आहे. अशा वेळी काही वरिष्ठ खेळाडूंना आराम देत संघात रवी बिष्णोई आणि त्यासारख्या युवा खेळाडूंना स्थान दिलं जाऊ शकतं.
4/5
इशान किशन-
आयपीएलमध्ये मुंबईच्या संघाकडून खेळणाऱ्या इशान किशन या खेळाडूनं सर्वच क्रीडारसिकांचं लक्ष वेधलं आहे. 2020मधील आयपीएल सामन्यांमध्ये त्यानं 500हून जास्त धावाही केल्या. त्यामुळं निवड समितीचं संघात समावेश करतेवेळी त्याच्यावरही लक्ष असणार आहे.
5/5
कोरोना महामारीमुळं यंदाच्या वर्षी भारतीय क्रिकेट संघ फार मालिका आणि सामने खेळू शकलेला नसला तरीही येत्या काळात म्हणजेच 2021 मध्ये मात्र संघाचं वेळापत्रक बऱ्याच अंशी व्यग्र दिसणार असल्याचं चित्र आहे. ऑस्ट्रेलियासोबतच्या उर्वरित कसोटी सामन्यांनंतर भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक अतिशय रोमांचक असणार आहे. यामध्ये 2021 टी20 विश्वचषक आणि 2021 च्या आशिया चषकाचा समावेश आहे. सामन्यांची हीच रेलचेल पाहता संघात पुढच्या वर्षीय काही युवा खेळाडूंचे चेहरे सातत्यानं दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.