Jasprit Bumrah | गोव्यात पार पडणार बुमराहचा विवाहसोहळा; संजना गणेशनसह बांधणार लग्नगाठ
भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज अखेर कोणाशी विवाहबंधनात अडकणार आहे, यावरुन पडदा उचलला गेल्याचं म्हटलं जात आहे. टीव्ही अँकर आणि प्रेझेंटर संजना गणेशन हिच्याशी बुमराह विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला असून, एका सुरेख ठिकाणी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App14 आणि 15 मार्चला गोव्यात या विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. असं असलं तरीही याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा अद्यापही समोर आलेली नाही. (छाया सौजन्य- संजना गणेशन/ इन्स्टाग्राम)
खुद्द जसप्रीत आणि संजनानं याबाबत मौन पाळलं आहे. बुमराहशी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनंतर नेटकऱ्यांनी लगेचच संजना गणेशन हिच्या सोशल मीडिया अकाऊंटला भेट दिली. ज्यानतंर तिची अनेक छायाचित्र व्हायरल झाली. (छाया सौजन्य- संजना गणेशन/ इन्स्टाग्राम)
दरम्यान, या विवाहसोहळ्याबाबतची उत्सुकता आणि कुतूहल आता शिगेला पोहोचलं आहे. कोरोनाच्या धर्तीवर संजना आणि जसप्रीत या दोघांच्याही कुटुंबातून ठराविक मंडळींचीच या विवाहसोहळ्यासाठी उपस्थिती असणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. (छाया सौजन्य- संजना गणेशन/ इन्स्टाग्राम)
मागील वर्षापासूनच संजना आणि जसप्रीत बुमराहच्या नात्याची चर्चा पाहायला मिळाली होती. आयपीएलच्या एका फॅन शोमध्येही तिचा सहभाग होता. (छाया सौजन्य- संजना गणेशन/ इन्स्टाग्राम)
सूत्रांच्या माहितीनुसार संजनानं 2012 मध्ये सिम्बायोसिस या संस्थेतून बीटेकचं शिक्षण घेतलं. यानंतर वर्षभरासाठी तिनं सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणूनही काम पाहिलं. (छाया सौजन्य- संजना गणेशन/ इन्स्टाग्राम)
2014 मध्ये तिनं मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. स्प्लिट्सव्हिला या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. (छाया सौजन्य- संजना गणेशन/ इन्स्टाग्राम)