PHOTO | ऑनलाईन परीक्षेसाठी नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांची धडपड, झाडावर बसून परीक्षा
सध्या मार्च महिन्यात परीक्षेचे दिवस असल्याने आणि त्यात कोरोना तसंच लॉकडाऊनमुळे शाळा बंदच आहेत. काही शाळांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांना मोबाईल नेटवर्कच्या शोधात तीन-तीन किलोमीटर पायी चालत जाऊन तर झाडावर बसून नेटवर्क मिळवावं लागत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात मोबाईल नेटवर्क नसल्याने किंवा कमी असल्याने ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आदिवासी भागातील मुलांना तर तीन किलोमीटर चालत जाऊन ऊंच डोंगरावर किंवा झाडावर बसून मध्य प्रदेशातील नेटवर्क मिळत असल्याने परीक्षा द्यायला सोप जात आहे.
काही लहान मुलं मोबाईल फोनवर ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी गटागटाने जंगलात ऊंच जागी किंवा झाडावर बसून अभ्यास करताना दिसत आहेत.
अशा कठीण प्रसंगी या ग्रामीण भागातील मुलांची अभ्यासासाठी तसंच परीक्षा देण्याची धडपड आणि जिद्द नक्कीच कौतुकास्पद आहे.