Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय कर्णधार

भारताने नुकताच महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौरला कर्णधार बनवले आहे. भारताने अनुभवी खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंनाही संधी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हरमनप्रीतने टी-20 वर्ल्ड कपपूर्वीच एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. महिला टी-20 वर्ल्ड कपच्या चार आवृत्त्यांमध्ये कर्णधारपद भूषवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

टीम इंडियाने 2018, 2020 आणि 2023 मध्ये हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली टी-20 वर्ल्ड कप खेळला होता. आता 2024 मध्येही भारतीय संघ हरमनसोबत मैदानात उतरणार आहे.
हरमनप्रीतसोबतच भारताने स्मृती मानधना, दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांचाही संघात समावेश केला आहे.
महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे.
भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 6 ऑक्टोबरला सामना होणार आहे.