Ambati Rayudu : माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू राजकारणा येताच , 9 व्या दिवसांत राजकारणातून बाहेर
माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू (Ambati Rayudu) राजकारणात आला. त्यानंतर अवघ्या 9 दिवसांमध्ये त्याने राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याने स्वत: राजकारण सोडत असल्याचे म्हटले आहे. रायडूने युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टीच्या (YSRCP) सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. रायडूने 9 दिवसांपूर्वी म्हणजेच 28 डिसेंबरला पक्षात प्रवेश केला होता.
मात्र, त्याने कायमस्वरुपी राजकारण सोडलेले नाही. पण तो काही कालावधीसाठी राजकारणापासून दूर झालाय. माजी क्रिकेटपटू रायडूने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिलीये
रायुडू ट्वीटमध्ये काय म्हणाला? रायुडूने राजकारणाच्या निर्णयाबाबत एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने लिहिले की, मी YSRCP युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी सोडण्याचा निर्णय घेतलाय.
याशिवाय मी राजकारणापासून काही काळ दूर जाण्याचा निर्णय घेतलाय. पुढे मी काय करणार याबाबत योग्य वेळी नक्कीच माहिती देईल.
रायुडूने 28 डिसेंबरला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थित त्यांचा पक्षात प्रवेश केला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेड्डीरेड्डी मिथून रेड्डी हे देखील उपस्थि होते.
दरम्यास, पक्ष का सोडतोय? याबाबत रायडूने स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. तो म्हणाला की, याबाबत मी योग्य वेळी भाष्य करेल.
आयपीएल 2023 नंतर क्रिकेटला केलाय अलविदा क्रिकेटपटू अंबाती रायुडू आयपीएल 2023 नंतर क्रिकेटला अलविदा केलाय. 2023 च्या आयपीएलमध्ये अंबाती रायुडू चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन बनला होता.
दरम्यान, यापूर्वी त्याने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. रायडूच्या आंतरराष्ट्रीय करियरबाबत बोलायचे झालेच तर त्याने 55 वनडे आणि 6 टी20 सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 203 आयपीएल सामनेही खेळले आहेत.