Ranji Trophy Payers Salary : रणजी ट्रॉफीची एक मॅच खेळण्यासाठी किती पैसे मिळतात? फक्त एका हंगामात खेळाडू बनू शकतो कोट्याधीश
अलिकडेच अनेक वरिष्ठ भारतीय खेळाडूंच्या रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमनाबद्दल जोरदार अटकळ बांधली जात आहे. विराट कोहलीपासून रोहित शर्मा आणि ऋषभ पंतपर्यंत सर्व खेळाडू आपापल्या रणजी संघांकडून खेळताना दिसू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे, बीसीसीआय आंतरराष्ट्रीय खेळाडूंना दरवर्षी कोट्यवधी रुपये देते. पण देशांतर्गत सामने खेळणारे खेळाडू किती कमावतील? हे जाणून घेईया.
रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना मासिक किंवा वार्षिक उत्पन्न मिळत नाही, परंतु त्यांना दररोज पगार मिळतो.
या भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचे लीग सामने 4 दिवस चालतात, परंतु नॉकआउट सामने 5 दिवस खेळवले जातात. रणजी खेळण्याचा पगार खेळाडूला किती अनुभव आहे यावर देखील अवलंबून असतो?
जर एखाद्या खेळाडूने त्याच्या कारकिर्दीत 41 किंवा त्याहून अधिक प्रथम श्रेणी सामने खेळले असतील. जर अशा खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले तर त्याला दररोज 60,000 रुपये पगार मिळतो. पण तो जर राखीव खेळाडू असेल तर दररोज 30,000 रुपये मिळतात.
जर एखाद्या खेळाडूला 21-40 सामन्यांचा अनुभव असेल, तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी दररोज 50,000 रुपये आणि राखीव खेळाडूंना 25,००० रुपये मिळतात.
जर एखाद्या खेळाडूने 0-20 रणजी ट्रॉफी सामने खेळले असतील, तर फक्त प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवल्याने 40,000 रुपये होते. ज्या खेळाडूंना संघात स्थान मिळत नाही, त्यांना दररोज 25,000 रुपये मिळतात.
गेल्या वर्षी जेव्हा बीसीसीआयने नवीन वेतन धोरण आणले. त्या धोरणानुसार, जर एखादा खेळाडू रणजी ट्रॉफी हंगामातील सर्व सामने खेळला तर तो सहजपणे 75 लाख रुपये कमवू शकतो.