Shani Gochar 2025 : तब्बल 30 वर्षांनंतर शनीचं गुरुच्या राशीत संक्रमण; 'या' 3 राशींचं भाग्य उजळणार, पैशांसारखा पडणार पाऊस
शनी देव 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. गुरुच्या राशीत प्रवेश केल्यामुळे काही राशींच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appज्या राशीच्या लोकांवर शनीच्या संक्रमणाचा प्रभाव पडतो अशा राशींच्या करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळते. त्यांची अप्रत्यक्षरित्या धनवाढ होते. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ राशीच्या लोकांवर शनीच्या राशी परिवर्तनाने चांगला लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला व्यवसायातही चांगलं यश मिळेल.
शनीचं संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना कोर्ट कचेरीच्या संदर्भातील सर्व समस्या लवकर सुटतील. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, एखादं मोठं प्रोजेक्ट तुमच्या हाती लागू शकतं.
मकर राशीच्या लोकांना शनीच्या संक्रमणाने चांगला लाभ मिळणार आहे. या राशी परिवर्तनाने तुमच्या साहस आणि पराक्रमात चांगली वाढ दिसून येईल. तसेच, अचानक धनप्राप्ती देखील होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)