एकमेवाद्वितीय विराट! शतकाच्या अर्धशतकानंतर किंगचा जल्लोष, फोटोतून पाहा सेलिब्रेशन
न्यूझीलंडविरोधात उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने शतकी तडाखा दिला. विराट कोहलीचे हे 50 वे शतक होय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशतकांच्या अर्धशतकानंतर विराट कोहलीचा आनंद गगणात मावत नव्हता. विराट कोहलीने स्टेडियममधील सर्वांचेच आभार व्यक्त केले.
विराट कोहलीने 106 चेंडूत शतक ठोकले. वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरसमोर विराट कोहलीने शतकांचे अर्धशतक ठोकले.
विराट कोहलीने शतकांचे अर्धशतक ठोकल्यानंतर ग्रेट सचिन तेंडुलकर याला अभिवादन केले.
त्याशिवाय पत्नी अनुष्का शर्मा हिला फ्लाईंग किस दिले. विराटची रिएॅक्शन सध्या चर्चेत आहे.
शतकांचं अर्धशतक झळकावताना समोर साक्षात क्रिकेटचा देव अर्थात सचिनपाजी असणं हे स्वप्नवतच आहे. माझी आयुष्याची सोबती आणि माझा हिरो सगळे माझ्या समोर बसलेले होते. शिवाय वानखेडेवर बसलेले सगळे क्रिकेटचे चाहते...हे सगळं शब्दात मांडणं कठीण आहे., असे विराट म्हणाला.
ग्रेट-महान माणसाने नुकतंच माझे अभिनंदन केलं. हे सर्व एका स्वप्नासारखं वाटतंय. पण हे सत्य आहे आणि ते माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. आमच्यासाठी हा सर्वात मोठा सामना आहे. मी माझी भूमिका पार पाडलीच. पण माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांनाही आपली कामगिरी चोख बजावता आली. माझी टीम जिंकणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, हे मी वारंवार सांगत आलोय. एक बाजू लावून धरणं आणि शेवटपर्यंत खेळत राहणं ही जबाबदारी या स्पर्धेत माझ्यावर दिली आहे. परिस्थितीनुसार खेळणे आणि टीमच्या गरजेनुसार खेळणे हीच माझ्या सातत्यपूर्ण कामगिरीची गुरुकिल्ली आहे, असेही विराट म्हणाला.
रोहित शर्माने दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर विराट कोहलीने भारताची धावसंख्या वाढवली. सुरुवातीला एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला. विराट कोहलीने शुभमन गिल याच्यासोबत आधी मोठी भागिदारी केली. गिल क्रॅम्प आल्यामुळे मैदानाबाहेर गेला. पण त्यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने शुभमन गिल याच्यासोबत 93 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अय्यरसोबत त्याने 128 चेंडूत झटपट 163 धावांची भागिदारी केली. विराट कोहली आणि अय्यर यांनी भारताची धावगती वाढण्याचे काम केले. विराट कोहलीने 113 चेंडूत 117 धावांची जिगरबाज खेळी केली. यामध्ये 2 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश आहे. विराट कोहलीने या शतकासह सचिन तेंडुलकरच्या वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत काढला.