निशीगंधा शेतीनं बदललं शेतकऱ्याचं नशीब, दिवसाला कमवतोय 30 हजार
शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी असतं तर कधी सुलतानी संकटं येतात. पण या संकटांचा सामना करत काही शेतकरी भरघोस उत्पादन घेत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहे. अशाच एका शेतकऱ्यानं फुल शेतीचा प्रयोग (experiment in flower farming) केला आहे. या विशीष्ट पुलाच्या शेतीतून शेतकऱ्याने लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.
हरियाणातील (Haryana) शेतकरी केवळ पारंपारिक पिकांच्या लागवडीतच नव्हे तर बागायतीमध्येही रस घेत आहेत.
फुलशेतीतून रोज हजारो रुपये कमावत आहेत. अनेक शेतकरी तुम्हाला राज्यात पाहायला मिळतील.
प्रदीप सैनी या फरिदाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यानं फुल शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. प्रदीप सैनी (Pradeep Saini) यांनी रजनीगंधा (Rajnigandha) फुलाची लागवड केली आहे.
प्रदीप सैनी यांना राज्य सरकारकडूनही फुलशेतीसाठी प्रोत्साहन देखील मिळालं आहे. फुलशेतीसाठी त्यांना उद्यान विभागाकडून अनुदान मिळाले आहे.
हरियाणातील शेतकरी फक्त गहू, धान आणि मोहरीचीच लागवड करतात असा लोकांचा समज आहे. पण तसे नाही. येथील शेतकरी आता इतर राज्यांतील शेतकऱ्यांप्रमाणे फळबागांमध्ये रस घेऊ लागले आहेत.
प्रदीप सैनी हे पूर्वी पारंपारिक पिके घेत असत. पण आता ते फुलांची लागवड करत आहे. त्यामुळं त्यांचे उत्पन्न देखील वाढले आहे.
आहे. विशेष म्हणजे आता जवळपासच्या गावातील लोकही प्रदीप सैनी या शेतकऱ्याकडून फुलशेतीच्या बारीकसारीक गोष्टी शिकू लागले आहेत.