Year Ender: रोहित, विराट अन् गिलनं 2023 गाजवलं; सर्वाधिक 50 प्लस स्कोअर करणाऱ्या टॉप-3 फलंदाजांमध्ये अव्वल
सरत्या वर्षाच्या निरोप घेण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. 2023 नं शेवटाच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू केली आहे. वर्षाचे अखेरचे काही दिवस सुरू आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक क्रिकेटपटूंनी आपली धमाकेदार कामगिरी दाखवली.
यंदाच्या वर्षात विराट कोहली, शुभमन गिल आणि टीम इंडियाचा स्टार कर्णधार रोहित शर्मा यांचा 50 हून जास्त धावा करणाऱ्यांमध्ये समावेश होतो.
टीम इंडियाच्या तिन्ही फलंदाजांनी यावर्षी फलंदाजीत चमकदार कामगिरी केली आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होतं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं नुकत्याच खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये शानदार फलंदाजी केली. तर गिलची बॅट वर्षभर जणून तळपलीच.
या वर्षी तिन्ही भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक 50 हून अधिक धावा केल्यात. या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. त्यानंतर शुभमन गिल दुसऱ्या आणि कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे.
विराट कोहलीनं 2023 मध्ये 36 डावांमध्ये 18 वेळा 50 प्लसचा टप्पा ओलांडला आहे.
शुभमन गिलनं यावर्षी 52 डावांमध्ये 17 वेळा 50 प्लसचा टप्पा ओलांडला आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं 2023 मध्ये 39 डावांमध्ये 15 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
येत्या वर्षातही टीम इंडियाचे तिन्ही धमाकेदार फलंदाज धमाकेदार कामगिरी करतील यात काही शंकाच नाही.