Ayodhya Airport Pics : तुम्ही अयोध्येचे नवीन विमानतळ पाहिलेत का? हे विमानतळ आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे
अयोध्येतील अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा 1,450 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 6,500 चौरस मीटर असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअयोध्येत बांधण्यात आलेल्या महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धामचे उद्या शनिवारी (३० सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
अयोध्येत बांधण्यात आलेले हे नवीन विमानतळ आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, तर राम मंदिराच्या स्थापत्य शैलीचे चित्रणही पारंपारिक स्वरूपात करण्यात आले आहे.
हे नव्याने बांधलेले विमानतळ मुख्य अयोध्या शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. त्यात आधुनिक बांधकाम साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
या विमानतळाला अयोध्या स्थानकाच्या नवीन इमारती प्रमाणे पारंपारिक स्वरूप देण्यात आले आहे. त्याचे मुख्य गेटही याच पद्धतीने बनवले बनवण्यात आले आहे.
अयोध्या टर्मिनल बिल्डिंगचा दर्शनी भाग अयोध्येतील श्री राम मंदिराच्या वास्तुकला प्रतिबिंबित करतो.
टर्मिनल इमारतीच्या आतील भागात स्थानिक कला, चित्रे आणि भगवान श्री रामाचे जीवन दर्शविणारी भित्तीचित्रे सजलेली आहेत.
अयोध्या विमानतळाची टर्मिनल इमारत विविध सुविधांनी सुसज्ज आहे ज्यात इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, एलईडी लाइटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कारंज्यांसह लँडस्केपिंग, जलशुद्धीकरण संयंत्र, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि सौर ऊर्जा प्रकल्प यांचा समावेश करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी अयोध्येच्या पुनर्विकसित रेल्वे स्टेशन आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत.
सर्वानाच अयोध्येचे हे सुंदर विमानतळ पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.