2 शतके, 5 अर्धशतके... विश्वचषकात विराटचा बोलबाला, सर्वाधिक धावाही केल्या
रनमशीन विराट कोहली याच्या बॅटमधून यंदाच्या विश्वचषकात धावांचा पाऊस पडत आहे. विराट कोहली यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू झालाय. विराट कोहलीने नऊ डावात 594 धावांचा पाऊस पाडलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविराट कोहलीने 99.00 च्या सरासरीने धावा चोपल्यात. विराट कोहली यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज झालाय. बेंगलोरमध्ये नेदरलँड्सविरोधात अर्धशतकी खेळी करत विराट कोहलीने क्विंटन डि कॉकला मागे टाकले.
यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीची बॅट तळपली आहे. विराट कोहलीने नऊ डावात 7 वेळा 50 पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. त्याला फक्त दोन वेळा अपयश आलेय.
पाकिस्तानविरोधात विराट कोहली 16 धावांवर बाद झाला होता. तर इंग्लंडविरोधात विराट कोहलीला खातेही उघडता आले नव्हते. या दोन सामन्याचा अपवाद वगळता विराट कोहलीने शानदार कामगिरी केली.
विराट कोहलीने नऊ सामन्यात 594 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतके आणि दोन शतकांचा समावेश आहे. सेमीफायनल आणि फायनल... दोन सामन्यात विराट कोहली किती धावा काढतो.. याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.