Health Tips : तुमच्या दिवसाची सुरुवात 'या' सुपरफूड्सने करा; मिळतील आश्चर्यकारक फायदे
जर तुम्हीसुद्धा सकाळी पोट साफ न होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही पदार्थांची नावे सांगणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरात्री पाण्यात भिजवलेले 5 ते 10 मनुके सकाळी रिकाम्या पोटी खा. यामुळे सुद्धा तुमचा बद्धकोष्टतेचा त्रास दूर होईल.
बद्धकोष्ठता दूर ठेवण्याबरोबरच आवळा आरोग्याच्या अनेक समस्यांपासून बचाव करतो. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी आवळा खा.
जर बद्धकोष्ठतेची समस्या जास्त जाणवत असेल तर तुम्ही जेवणात किंवा सूपमध्ये आवळ्याचा वापर केला तरी चालेल.
देशी गाईचे शुद्ध तूप पचनसंस्थेसाठी रामबाण औषधासारखे काम करते.
. गाईचे तूप सकाळी दूध किंवा चहामध्ये घालून सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळेल.
खजूर तुमच्या पोटासाठी फार चांगले मानले जाते. यासाठी दररोज 2 ते 3 खजूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी नाश्त्यापूर्वी त्याचे सेवन करा.
तुम्ही ते दुधाबरोबर खाऊ शकता किंवा कोमट पाण्याबरोबर देखील खाऊ शकता.
जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास वाढत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मेथीदाण्यांचे चूर्ण कोमट पाण्याबरोबर घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.