IPL 2025 : विराट कोहली पुन्हा आरसीबीचा कॅप्टन होण्याची शक्यता, दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंतला टाटा बाय बाय करणार?
टीम इंडियाचा आघाडीचा खेळाडू विराट कोहली पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन होण्याची शक्यता आहे. आरसीबीकडून विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयालला रिटेन केलं जाईल, अशी माहिती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा आणि नमन धीर यांना आयपीएल 2025 साठी रिटेन केलं जाऊ शकतं.
दिल्ली कॅपिटल्स अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स आणि फ्रेजर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांना रिटेन करु शकते.
पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंगला रिटेन केलं जाणार नसल्याची माहिती आहे. पंजाबचा संघ 112 कोटी रुपयांसह मेगा ऑक्शनमध्ये उतरणार असल्याची माहिती आहे.
टीम इंडियाचा विकेटकीपर आणि दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन पुढचं आयपीएल दिल्लीकडून खेळेल की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं रिषभ पंतला रिटेन न करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.