Happy Diwali 2024 Wishes : दिवाळीनिमित्त मित्र-परिवाराला द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
चंद्राचा कंदील घरावरी चांदण्यांचे तोरण दारावरी.. क्षितीजाचे रंग रांगोळीवरी दिवाळीचे स्वागत घरोघरी..! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभ दीपावली…
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल, दिवाळी पहाट शुभ दीपावली!
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य असू दे! चांगल्या मार्गाने समृद्धी मिळो, लक्ष्मीपूजनाचे सौख्य नेहमी लाभो! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
जुने जुने विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा पर्यावरणाशी एकरुप होऊन सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा उत्सव प्रकाशाचा अवतरला तेजस्वी सण दिवाळीचा दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा!
फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जचच न्यारी नव्या नवलाईची दिवाळी येता आनंदली दुनिया सारी... दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
अभ्यंगस्नानाने झाली पहाट, दारी रांगोळीचा थाट, सण आला प्रकाशाचा, दिव्यांची केली रास चिवडा, करंजी, चकली, फटाकेही खास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)