Virat Kohli : किंग कोहलीचा शाही थाट, प्रॅक्टिससाठी पोर्शे कारमधून मारली एन्ट्री; नंबरही एकदम खास; गाडीची किंमत वाचून व्हाल थक्क!

जेव्हा जेव्हा विराट कोहलीबद्दल चर्चा होते, तेव्हा तेव्हा केवळ त्याच्या मैदानावरील कामगिरीचीच चर्चा होत नाही. तर तो मैदानाबाहेर काय करत आहे हे देखील बातम्यांमध्ये येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली जवळपास 12 वर्षांनी देशांतर्गत रणजी ट्रॉफी स्पर्धेत दिसणार आहे.

नोव्हेंबर 2012 नंतरच्या त्याच्या पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यापूर्वी विराट कोहली नेटमध्ये घाम गाळत आहे. कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती.
सकाळी ठीक 9 वाजता विराट कोहलीने काळी पोर्श कार फिरोजशाह कोटला मैदानावर एन्ट्री मारली.
या कारची सध्याची एक्स-शोरूम किंमत 2.34 कोटी रुपये आहे. ही कार फक्त 3.1 सेकंदात 0-100 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठते. तसेच त्याचा टॉप स्पीड 315 किलोमीटर प्रति तास आहे.
दरम्यान, पीटीआयच्या वृत्तानुसार कोहलीने यावेळी दुपारच्या जेवणात छोले-भटुरे खाल्ले नाही. कोहलीला छोले-भटुरे खूप आवडतात, पण त्याने दुपारच्या जेवणात करी भात खाल्ला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाची कामगिरी खराब झाली. यानंतर बहुतेक वरिष्ठ खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसले आहेत.