Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
भारतीय पॅरालम्पिक धनुर्धर शितल देवीला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शब्द दिल्याप्रमाणे कार गिफ्ट केली आहे. भारतीय तिरंग्यात कारसमोरचा तिचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआनंद महिंद्र यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देताना शितल देवीला कार देतानाचे फोटोही शेअर केले आहेत. यावेळी, आपणास अत्यानंद होत असल्याचं त्यांनी म्हटलं.
शितल देवीला स्कॉर्पिओमध्ये पाहून अभिमान वाटत आहे, ती आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे. ही कार तिच्यासाठी परफेक्ट आहे. कारण, ती नव्या उंचीवर जाण्यासाठी सज्ज आहे, असेही महिंद्रा यांनी म्हटलंय.
मी शितल देवीचं कर्तृत्व आणि त्याच्या इच्छाशक्तीचा अगोदरपासूनच चाहता आहे. मात्र, तिला व्यक्तीश: भेटून अधिक आनंद झाला. मी तिच्या आई व बहिणीसोबतही संवाद साधला, असे महिंद्र यांनी म्हटले.
शितल देवी ही भारताची 17 वर्षीय सर्वात कमी वयाची पॅरालम्पिक धनुर्धर आहे, जेनेटिक डिसऑर्डर फोकोमेलिया या आजारामुळे तिला जन्मत: अपंगत्व आले. तिला जन्मापासून दोन्ही हात नाहीत.
मात्र, हाताच्या रेषा नशिब घडवत असून तुमचं कर्तृत्व नशिब घडवतं हे शितल देवीने दाखवून दिलंय. 17 व्या वर्षीच तिने पॅरालम्पिक मिक्स्ड संघात कास्य आणि आशियाई चॅम्पियन स्पर्धेत गोल्ड आणि सिल्व्हर पदक जिंकले आहे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिच्या या यशाबद्दल शितल देवीचे अभिनंदन केले होते. तर, आनंद महिंद्रा यांनी तिला कार गिफ्ट देण्याचे म्हटले होते. त्यानुसार आज ती कार गिफ्ट करण्यात आली आहे.