Virat Kohli : चाहत्यांना होती विराट आणि नवीनच्या 'ठस्सन'ची प्रतीक्षा, पण मैदानात काय घडलं? पाहा फोटो
भारतीय खेळाडू विराट कोहली आणि अफगाणचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्यात आयपीएलदरम्यान वादावादी झाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर आजच्या वर्ल्ड कप सामन्यात चाहत्यांना दोन्ही खेळाडूंमधील ठस्सनची प्रतीक्षा होती.
त्यामुळेच विराट कोहली आणि नवीन उल हक सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत होते.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर उपस्थित असलेले चाहते विराट-विराट असा जयघोष करत होते. दरम्यान, नवीन उल हक विराट कोहलीकडे गेला. त्यानंतर विराट कोहलीने नवीन उल हकला मिठी मारली.
यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना प्रोत्साहन दिले. तसेच दोन्ही खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू स्पष्ट दिसत होते.
विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील खिलाडू वृत्तीचे दर्शन चाहत्यांना झाले.
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 56 चेंडूत नाबाद 55 धावांची खेळी साकारली.