success story : दोन एकर डाळींब शेतीतून 30 लाखांचं उत्पन्न
शेतकऱ्याने डाळींब शेतीतून आर्थिक प्रगती साधलीय. या शेतकऱ्यानं दोन एकर डाळींब शेतीतून 30 लाखांचं उत्पन्न घेतलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील नांदोरे गावातील शेतकरी प्रताप भिंगारे यांनी दोन एकर क्षेत्रावर डाळींबाची बाग केली आहे. या बागेतून त्यांनी मोठा आर्थिक नफा मिळवला आहे.
प्रताप भिंगारे यांनी डाळींब बागेचं उत्तम नियोजन केलं आहे. भिंगारे यांनी आपल्या डाळींब शेतीतून इतर शेतकऱ्यांसोर आदर्श मांडला आहे.
प्रताप भिंगारे यांनी दोन एकर क्षेत्रावर डाळींबाच्या बागेची लागवड केली आहे. दोन एकरात 900 झाडांची लागवड केली आहे. या बागेतून त्यांना डाळींबाचे 25 टन उत्पन्न निघाले.
प्रतिकिलो डाळींबासाठी 121 रुपयांचा चांगला दर मिळाला. यातून प्रताप भिंगारे यांना तब्बल 30 लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. यातून त्यांची आर्थिक भरभराट झाली आहे.
भिंगारे यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावर भगवी जातीचं डाळींब लावले आहे. त्यानंतर त्यांनी बी एस सी अॅग्री असलेले शेती अभ्यासक अण्णा पाटील यांचे मार्गदर्शन घेतलं.
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगारे यांनी डाळींबाच्या बागेला वेळेवर खतपाणी दिले. रासायनीक खतांबरोबर जैविक खते, शेणखत देखील बागेला टाकले. तसेच वेळेवर छाटणी केली. पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले आहे. ड्रीप सिस्टीमद्वारे बागेला पाणी देत असल्याची माहिती शेतकरी प्रताप भिंगारे यांनी दिली.
प्रताप भिंगारे यांची बाग उत्तम आणि चांगली फळधारणा असल्यामुळे व्यापाऱ्यांनी जागेवर येऊन डाळींबाची खरेदी केली. शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीचा तोडणीचा खर्च करावा लागला नाही. जागेवरच व्यापाऱ्यांनी मालाची खरेदी केल्यामुळं प्रताप भिंगारे यांचा मोठा खर्च वाचला असून, त्यांना अधिकचा नफा मिळाला
व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला प्रताप भिंगारे यांचा काही माल विक्रीसाठी बांगलादेशमध्ये पाठवला आहे. तर काही माल हैदराबाद आणि कोलकातामध्ये पाठवल्याची माहिती प्रताप भिंगारे यांनी दिली.